A2Z सभी खबर सभी जिले की

भोसरीत भरधाव कारची महिलेला धडक, २४ तासांनंतरही गुन्हा दाखल नाही

जेठमल मुथा जिल्ला प्रमुख पुणे वंदेभारत लाईव्ह टीव्ही न्यूज

भोसरी – पिंपरी चिंचवड परिसरात हिट अँड रनचे प्रकार वाढत असताना पोलिस मात्र झोपी गेलेत की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातत्याने घडणाऱ्या घटनांनंतरही त्यावर वेळीच कारवाई केली जात नाही. भोसरी परिसरात असाच हिट अँड रनचा प्रकार घडला असताना त्याला २४ तास उलटून गेले तरीही त्यावर गुन्हा नोंद करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणावर आता नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटी समोर एका भरधाव कारने एका महिलेला उडवल्याची घटना घडली. त्यानंतर ती कार न थांबता निघून गेली. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ती कार एवढ्या भरधाव होती की ती महिला हवेत उडाली होती.
या अपघाताची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे. अपघातात त्या महिलेला जखमी करून संबंधित कारचालक कारसह पसार झाला आहे. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. काही दिवसांपूर्वी हिंजवडी भागात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. प्रसारमाध्यमांत बातमी आल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता भोसरी एमआयडीसी पोलीस या वाहनचालकावर कधी पुन्हा दाखल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Show More

AAJ TAK Live Tv News

AAJ TAK Live Tv News
Back to top button
error: Content is protected !!